Friday, May 22, 2020


महाविद्यालयाच्या लॉगीनवरील प्रलंबित अर्ज
समाज कल्याणच्या लॉगिनवर फॉरवर्ड करण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 22 (जिमाका) :- महाडिबीटी प्रणाली अंतर्गत शैक्षणिक वर्षे 2019-20 मधील अद्याप कॉलेज लॉगिनवर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज 26 मे 2020 पर्यंत समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड केल्यामुळे विदयार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहा्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.  
भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती,व्यवसायीक पाठयक्रमाच्या विदयार्थ्यांना निर्वाह भत्ता राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजने अंतर्गत कनिष्ठ / वरीष्ठ अनुदानित, विनाअनुदानित, व्यवसायि बिगर व्यवसयिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी महाडिबीटी पोर्टल प्रणाली अंतर्गत www.mahadbtmahait.gov.in संकेतस्थळ कार्यान्वीत करण्यात आले आहे.
अनु.जाती, विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना नमूद योजनेअंतर्गत महाडिबीटी पोर्टल प्रणालिमध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या / महाविद्यालयाच्या वैयक्तीक बँक खात्यावर जमा करण्यात येते.
शैक्षणिक वर्ष 2019 -20 मधील महाडिबीटी पोर्टल प्रणालीमधील महाविद्यालयाच्या लॉगीनवर प्रलंबित असलेले अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करण्यासाठी 26 मे 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेल्या अर्जाची  महाविद्यालय स्तरावर छानणी करून आवश्यक सर्व कागदत्रांची पूर्तता करित असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाच्या लॉगिन मधून समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करावीत.
विनाअनुदानित व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज (हार्ड कॉपी) आवश्यक कागदपत्र समाज कल्याण कार्यालयास छाननी प्रक्रीयेसाठी  31 मे 2020 पूर्वी सादर करावेत.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...