Friday, May 22, 2020


कोरोनाचे आज 11 रुग्ण बरे झाल्याने सुट्टी ;    
एकुण 116 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 52 रुग्ण बरे ;  
तर 56 रुग्णांवर औषधोपचार सुरु
नांदेड, दि. 22 (जिमाका) :- कोरोना विषाणुसंदर्भात नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी शुक्रवार 22 मे 2020 रोजी सायं. 5 वा. प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार यात्री निवास एनआरआय कोविड केअर सेंटर येथील 10 रुग्ण व डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील 1 रुग्ण असे एकुण 11 रुग्ण औषधोपचारामुळे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 116 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 52 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत 56 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
            नांदेड जिल्ह्यात 22 मे पर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 29 हजार 474 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 961 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 541 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून गुरुवार 22 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 134 रुग्णांचे अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होतील व 43 रुग्णांचे स्वॅब तपासणी चालू आहे. सदर घेतलेल्या एकुण स्वॅबपैकी 116 रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
            गुरुवार 21 मे रोजी प्राप्त झालेले एकुण 87 अहवालांपैकी 6 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. त्यामध्ये 4 पुरुष ज्यांचे अनुक्रमे वय वर्षे 14, 18, 33, 74 आहे तर दोन स्त्री रुग्णांचे वय अनुक्रमे 34 व 65 आहे. त्यामधील एका पुरुषाचे वय वर्षे 74 यांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांपैकी 2 रुग्ण मुखेड तालुक्यातील, एक बिलोली तालुक्यातील तर एक रुग्ण प्रवासी एनआरआय भवन येथे व उर्वरीत दोन रुग्ण हे नांदेड शहरातील लोहारगल्ली भागातील आहेत.
            एकुण 116 रुग्णांपैकी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 52 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचे 56 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 42 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 1 रुग्ण, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 3 रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थिर आहे.  
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...