Tuesday, June 20, 2023

 राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाच्या

कर्ज योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) 20 :- राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली (एनएसटीएफडीसी नवी दिल्ली) यांच्याकडे विविध योजनांचा / व्यवसायांचा सन 2023-24 करीता कर्ज प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. त्याअनुषंगाने शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. यांना दिलेल्या लक्षांक / उद्दिष्टांप्रमाणे त्यांच्या कार्यक्षेत्रातील कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या योग्य व पात्र लाभार्थ्यांची निवड करून मुल्यमापन समितीचे शिफारशीसह परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 15जुलै 2023 पर्यंत मुख्य कार्यालयास सादर करावा.

 

सहपत्र (लक्षांक / उद्दिष्ट) बाबत शाखा व्यवस्थापकांनी आपल्या कार्यक्षेत्रात लक्षांक पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. तसेच कोणाच्याही दबावाखाली न येता खरोखरच ज्या व्यवसायाची आवश्यकता आहेव जे लाभार्थी व्यवसाय करण्यास इच्छूक आहे व परतफेड करतील अशा लाभार्थ्यांचा प्रस्ताव सादर करावा. मात्र कुठेही व्यवसाय न करता निधी मिळवणे अशी मानसिकता दिसल्यास तसे प्रस्ताव सादर करू नयेत. आपल्याकडील परिपूर्ण कर्ज प्रस्ताव मुख्य कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर एनएसटीएफडीसी नवी दिल्ली यांच्याकडे निधी मागणी करीता प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याने सदरकामी कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाहीयाची दक्षता घेण्यात यावी.

 

हे लक्षांक पुर्ण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना पुढीलप्रामणे आहेत. एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज योजनेअंतर्गत कृषी आणि संलग्न व्यवसाय (रुपये 2 लक्ष) व लघु उद्योग व्यवसाय (रुपये 3 लक्ष) अंतर्गत लाभार्थी निवड करतांना www.nstfdc.tribal.gov.in या संकेतस्थळावरील व्यवसायाच्या यादीच्या अनुषंगानेच आपल्या कार्यक्षेत्रातील वाव असणारे व्यवसायाभिमुख योजनेच्या लाभार्थ्यांचे कर्ज मंजुरी प्रस्ताव सादर करण्याची दक्षता घ्यावी. (www.nstfdc.tribal.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Help Zone यावर क्लिक केल्यानंतर Indicative Schemes मधील व्यवसायाची यादी.)

 

आपणाकडे प्राप्त झालेले लाभार्थ्यांचे कर्ज मागणी प्रस्तावआपणास देण्यात आलेल्या लक्षांकानुसार मूल्यमापन समितीसमोर ठेवून समितीच्या शिफारशीसह मुख्य कार्यालयाकडे तात्काळ मंजुरीस पाठविण्यात यावे. कर्ज वाटप करतांना प्राप्त अर्जांची छाननी करून कर्जाची परतफेड करू शकणाऱ्या योग्य व पात्र लाभार्थी निवड करण्याची तसेच आवश्यक कागदपत्रांची व करारनाम्याची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधीत शाखा व्यवस्थापक यांची राहील. मुख्य कार्यालय नाशिक स्तरावर योजना निहाय नस्ती ठेवण्यात येत असल्यामुळे या कर्ज योजनांच्या मूल्यमापन समितीच्या शिफारशीसह योजनानिहाय प्रस्ताव पाठविण्यात यावेत.

 

एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज योजना राबविण्याची तसेच कर्ज वितरणाची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाखा कार्यालयाची राहील व यास संबंधित शाखा व्यवस्थापक जबाबदार राहतील. मुख्य कार्यालयाकडून कर्ज प्रकरण मंजुरी दिल्यानंतर व तसे आदेश प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांचा सहभागवाढीव सहभाग रक्कम लाभार्थ्यांकडून शाखा कार्यालयास जमा करून कर्ज वितरणाची कार्यवाही करण्यात यावी.

 

किनवट शाखा कार्यालयाअंतर्गत महिला सबलीकरण योजना (रु.2 लक्ष)-8बचतगट योजना (रु. 5 लक्ष)-1कृषी आणि संलग्न व्यवसाय (रु.2 लक्ष)-11हॉटेल ढाबा व्यवसाय (रु.5 लक्ष)-3स्पेअर पार्ट / गॅरेज / ऑटो वर्कशॉप (रु.5 लक्ष)-2वाहन व्यवसाय (रु.10 लक्ष पर्यंत)-1लघु उद्योग व्यवसाय (रु.3 लक्ष)-1 याप्रमाणे एकुण 27 लक्षांक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक यांनी दिले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...