Wednesday, June 21, 2023

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत 25 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत

25 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातर्गंत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी रविवार दिनांक 25 जून रोजी अबचल नगर मैदान, नांदेड येथे  रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यास जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी  वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या, सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. काही अडचण असल्यास दुरध्वनी क्रमांक (02462) 251674 किंवा ई-मेल nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...