वृत्त क्र. 647
श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत योग दिवस साजरा
नांदेड, दि. २१ जून:- जगभरामध्ये 21 जून हा आंतरराष्टीय योग दिवस म्हणून साजरा केल्या जातो. आरोग्याच्या दष्टीने योग साधनेचे अनन्य साधारण महत्व असून राज्यातील सर्व सामान्य व्यक्तिपर्यंत योग साधनेची गोडी वध्दींगत होण्यासाठी सर्व शासकीय/खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था मध्ये आंतरराष्टीय योग दिवस साजरा करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या होत्या.
त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आज 21 जून रोजी आंतरराष्टीय योग दिवस साजरा करण्यात आला.
या निमित्ताने योगतज्ञ म्हणून आर. जी. केंद्रे, माजी गटनिदेशक व डॉक्टर संगनोड साहेब उपस्थित होते. त्यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे जीवनामध्ये योगसाधनेबददल अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे प्राचार्य सुर्यवंशी एस.व्ही, उपप्राचार्य कंदलवाड व्ही.डी. अन्नपुर्णे पी. के. सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र व्दारा नांदेड तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्व नियोजन राष्टीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी पोतदार डी. ए. यांनी केले.
००००००
No comments:
Post a Comment