Monday, June 23, 2025

वृत्त क्र. 651

सामाजिक न्याय दिनानिमित्त गुरुवारी समता दिंडीचे आयोजन

विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन 

 नांदेड, दि. 23 जून :-राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून 2025 रोजी सकाळी 8 वा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिनानिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या समता दिंडीमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. 

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन समता दिंडीची सुरवात होईल. या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप होईल.

00000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...