Monday, August 1, 2022

 नांदेड जिल्ह्यातील 125 शाळांमध्ये

बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम

 

नांदेड (जिमाका) दि.  1 :- शालेय विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्याबाबत जाणीव आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात विशेष उपक्रम हाती घेतला आहे. महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, आणि एसबीसी 3 मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील 125 जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यातून जिल्ह्यातील 3 लाख विद्यार्थी व 6 लाख पालकांपर्यंत बालविवाह निर्मूलनाच्या संदेश पोहचणार आहे.


या कार्यक्रमाची सुरूवात नांदेड येथून झाली असून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील महिला व स्वयंसेवक यांना प्रशिक्षण करून त्यांच्या मार्फत मोफत कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

याबाबत नांदेड येथे 30 व 31 जुलै   रोजी दोन दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी मिलिंद वाघमारे, गजानन जिंदमवाड, एसबीसी 3 मुंबईच्या संस्थापक सीमा कोनाळे, स्मिता फुलझेले, प्रकल्प समन्वयक दिना सायमूल यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम नांदेड, हिंगोली, परभणी, व जिल्ह्यातील 94 महिला व स्वयंसेविका व सामाजिक संस्थेचे पर्यवेक्षक यांच्या सहभागाने राबविण्यात येत आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...