Wednesday, January 1, 2020


संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्र कामकाजासाठी
स्वयंसेवी संस्थांना प्रस्ताव करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 1 : स्वयंसेवी संस्थांकडून वन स्टॉप क्रायसेस सेंटर (संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्र) चे दैनंदिन कामकाज हाताळण्यासाठी नेमावयाच्या पात्रताधारक संस्थेसाठी प्रस्ताव शुक्रवार 10 जानेवारी 2020 पर्यंत मागविण्यात आले आहेत.
 या केंद्राचे दैनदिन कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या वन स्टॉप क्रायसेस सेंटरच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे, पात्रताधारक एजन्सीची निवड करावयाची आहे. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये नमुद केल्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महिलांविषयक कायदे व योजनांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था, अशा स्वयंसेवी संस्थांमधून पात्रताधारक संस्थेची निवड करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील नमुद मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांकडून शुक्रवार 10 जानेवारी 2020 अखेर परिपूर्ण प्रस्ताव (अर्जात नमुद मुद्यांप्रमाणे पृष्ठांकीत केलेला) मागविण्यात आले आहेत.
इच्छूक नमुद मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्जाचा नमुना सोमवार 6 जानेवारी 2020 पर्यंत जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, 24 - गणेशकृपा, शास्त्रीनगर (भाग्यनगर जवळ), नांदेड- 431605 येथे शासकीय सुट्या वगळता उपलब्ध राहील. या कार्यालयाने वितरीत केलेल्याच अर्जाचा नमुना, निवड प्रक्रीयेदरम्यान विचारात घेतला जाईल, असे आवाहन अध्यक्ष जिल्हा व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून नांदेड जिल्ह्यासाठी वन स्टॉप क्रायसेस सेंटर मंजूर करण्यात आले आहे. हे केंद्र तात्पुरत्या स्वरुपात, लाल बहादुर शास्त्रीनगर नांदेड येथे श्री नारायण कामाजी गोरे यांची इमारत रविदास निवास, घर क्र. 1/12/849 येथे दि. 13 जून 2017 पासून जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन व कायदेशिर मदत इ. तातडीने उपलब्ध होईल यासाठी कार्यान्वीत करण्यात आली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात नमूद केली आहे.
००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...