Thursday, December 8, 2022

 जिल्ह्यात गोवर आणि रुबेलाबाबत

घाबरून न जाता काळजी घ्या

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत     

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- गोवर व रुबेलाचा प्रभाव जिल्ह्यात वाढू नये, याचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य विभाग दक्ष आहे. यादृष्टिने जिल्ह्यात 15 ते 25 डिसेंबर या कालावधीत विशेष लसीकरण मोहिम हाती घेतली जाणार असून अधिकाधिक पालकांनी आपल्या मुलांना आणून या लसीची मात्रा घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

गोवर व रुबेला दूरीकरण जिल्हा टास्क फोर्सची बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा काळम आदी अधिकारी उपस्थित होते.

 

नांदेड महानगरात सुमारे 65 हजार बालकांची संख्या आहे. गोवरचा आजार लहान मुलांना होऊ नये यासाठी बालकांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक असून महानगरपालिकेने यात अधिक भर देऊन काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी  दिल्या. हा आजार जिल्ह्यात होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सर्व आरोग्य यंत्रणेने सर्व्हीलन्स, शाळेत जर मुले गैरहजर असतील त्यांच्याबाबत चौकशी यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

00000



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1161   राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन नांदेड दि. 4 डिसेंबर:- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, ...