इंटरनेट पाहण्याचा कालावधी निश्चित असावा
- डॉ. नंदकुमार मुलमुले
नांदेड
दि. 23 :- इंटरनेट पाहण्याचा कालावधी निश्चित केला पाहिजे. यासाठी मोबाईल वापराचा
अतिरेक टाळुन मोबाईल वापरण्यात
शिष्टाचार असला पाहिजे, असे प्रतिपादन "माध्यम संस्कृती व वाचन संस्कृती" या विषयावर आयोजित
परिसवांदात डॉ. मुलमुले
यांनी केले.
वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी ग्रंथगुढी
उभारली पाहिजे असे डॉ. हनुमंत भोपाळे म्हणाले. पुस्तकाचे
वाचन काही कमी झाले
नाही. अनेक पुस्तकांच्या 30 ते 50 आवृत्या निघाल्या
आहेत. पुस्तकांची माहिती इंटरनेटवर जास्त
कळते त्यामुळे माध्यमे व पुस्तकं
वाचन संस्कृती वाढण्याला नक्कीच
सहाय्यभूत ठरत आहे असे
डॉ. गोविंद हंबर्डे म्हणाले. सामान्य माणूस
हा केंद्रबिंदू मानून
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी माध्यमांचा
उपयोग झाला पाहिजे असे
अप्पर कोषागार अधिकारी नीळकंठ
पांचगे यांनी सांगितले. स्वा.रा.ती.विद्यापिठाच्या प्राध्यापिका
डॉ.
शैलजा वाडीकर यांनी माध्यमामुळे
एकमेकांपासून दूर जात असल्याची
खंत व्यक्त केली माध्यमांचा
वापर कसा करावा हे ठरविले
पाहिजे असे सांगितले.
परिसंवादाचे प्रास्ताविक
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील
हुसे यांनी केले तर संचालन
पद्ममाकर कुलकर्णी
यांनी केले. आभार बी.जी.देशमुख
यांनी मानले.
कथाकथन कार्यक्रम चांगलाच रंगला
ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित
पहिल्या सत्रात कथाकथन झाले
त्यामध्ये डॉ. जगदिश
कदम यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. नागनाथ पाटील, प्रा.नारायण
शिंदे, डॉ.शंकर विभूते, रविचंद्र हडसनकर, शंभूनाथ कहाळेकर यांनी भन्नाट
कथा सादर केल्या आणि
प्रेक्षकांची दाद मिळविली. राजेंद्र हंबिरे
यांनी आभार मानले.
000000
No comments:
Post a Comment