वृत्त क्रमांक 174
मातंग समाजातील होतकरू विद्यार्थ्यांनी उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे : शिंदे
महामंडळाकडे अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 28 : मातंग समाजातील विविध 12 पोट जातीतील विद्यार्थ्यांनी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी विविध व्यवसाय उद्योग व उद्योग समूहात काम करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त करावे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत यासाठी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मातंग समाजातील विविध 12 फूट जातीमध्ये शिक्षणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे समाजातील गरजूंना आता उद्योग व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. केवळ नोकरदार होण्यापेक्षा नोकरी देणारे होण्यासाठी विविध उद्योग, व्यवसाय, संस्था उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध प्रशिक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाकरिता 20 मार्च 2024 पर्यंत महामंडळाकडे अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे कार्यालय असून याठिकाणी यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment