सामाजिक न्याय भवनात महात्मा फुले जयंती साजरी
नांदेड (जिमाका) दि. 11 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने 6 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीत सामाजिक समता कार्यक्रम सुरु आहे. थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करून त्यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने येथील सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात महात्मा जोतिराव फुले यांच्या सामाजिक कार्यांवर देविदास फुलारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, गृहपाल गणेश भायेगावकर, सुधाकर बनसोडे, श्रीमती कविता सुकळकर, श्रीमती रविता आडे, समाज कल्याण निरीक्षक दत्ताहारी कदम, पंडित खानसोळे, कैलास मोरे, रंगराव सुर्यवंशी, श्रीमती माधवी राठोड आदींसह विविध सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
देविदास फुलारी यांनी महात्मा जोतिराव फुले
यांच्या कार्यांची अनेक उदाहरणे दिली. विद्यार्थ्याना महापुरुषांच्या जीवनावरील पुस्तकांचे
नियमित वाचन करावे, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी बापू दासरी
यांनी केले. या व्याख्यानास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले तर आभार सहाय्यक ग्रंथपाल श्रीमती
ममता गंगातीर यांनी मानले.
0000000
No comments:
Post a Comment