Saturday, August 13, 2022

 भारतीय ध्वज संहितेचे पालन करावे  

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने या कालावधीत नोंदणीकृत सर्व दुकाने, आस्थापनांनी राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी प्रेरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दुकाने, व्यापारी संकुल व सर्व आस्थापनांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अनवर सय्यद यांनी केले आहे.

 

राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या व हाताने विणलेल्या किंवा पॉलीस्टर, सिल्क, खादीपासून तयार केलेल्या कापडाचे असावेत. हा उपक्रम राबवतांना भारतीय ध्वज संहितेचे पालन करावे. जाणते, अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्व दुकान, आस्थापना मालकांनी घ्यावी, असेही सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...