भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “घरोघरी तिरंगा” उपक्रम
नांदेड (जिमाका) दि. 12 :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, तसेच सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी अस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही. कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल.
00000
No comments:
Post a Comment