जिल्हाधिकारी नांदेड द्वारा आयोजित" फ्रीडम जाॅईन रॅली" लक्षवेधी
नांदेड (जिमाका) दि. १२ जिल्हाधिकारी नांदेड च्या वतीने स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियानात "फ्रीडम जाॅईन" रॅली चे यशस्वी आयोजन लक्षवेधी ठरले.
सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदिर,शिवाजीनगर, आयटीआय , व्हीआयपी रोड मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचली.
सदर रॅलीच्या सुरूवातीस वंदेमातरम गीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने सादर करुन हर घर तिरंगा बाबत जनजागृती साठी चे पथनाट्य सादर करण्यात आले. पोलीसांच्या बॅंड पथकाच्या देशभक्ती पर धून ने परिसरातील सर्वांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. डाॅ.उद्धव भोसले कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, डॉ.विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली.स्काऊट गाईड मुलींनी हर घर तिरंगा राखी मान्यवरांच्या हातावर बांधल्यानंतर कुलगुरूसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी तिरंगा ध्वज ओवाळणी म्हणून विद्यार्थीनींच्या हाती दिला.
ध्वनिक्षेपक लावलेले फिरत्या वाहनांसह नॅशनल कॅडेट कोर,स्काऊट गाईड, राष्ट्रीय सेवायोजना विद्यार्थी ,नेहरू युवा केंद्राचे विद्यार्थी ,रोलर स्केटिंग खेळाडू , माध्यमिक प्राथमिक शाळांचे बारा हजार पेक्षा अधिक विद्यार्थी तिरंगी ध्वजासह सदर रॅलीत सहभागी झाले.विद्यार्थ्यांच्या घोषणांसह NCC विद्यार्थी यांनी क्रीडा संकुल पर्यंत फडकवत नेलेला १०० फूट लांबीचा तिरंगा" हर घर तिरंगा"चा संदेश देत होता. रॅलीत ठिकाणी झालेली ललीत व प्रयोगजीवी कला संकूल विद्यापीठ मार्फत सादर पथनाट्य ,गीते व ललीत कला अकादमी नांदेड च्या वतीने सादर केलेला भारत मातेचा देखावा, व देशभक्ती पर नृत्यांनी लक्ष वेधून घेतले.
सदर रॅली जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचल्यानंतर विद्यार्थीनी "हर घर तिरंगा व ७५" आकारात रचना करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व हर घर तिरंगा अभियानाचा संदेश दिला. सदर रॅलीत जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी देवकुळे, तहसीलदार ज्योती चव्हाणसह इतर अधिकारी कर्मचारी व तहसील नांदेड येथील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विद्यापीठासह अनेक महाविद्यालयीन प्राध्यापक, ललीत कला संकूल संचालक डॉ पृथ्वीराज तौर, राष्ट्रीय सेवायोजना संचालक डॉ.मल्लीकार्जून करजगी व त्यांचे सहकारी यांचे सह ५० पेक्षा अधिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती.
सात हजार पाचशे विद्यार्थी यांच्या सहभागाचे नियोजन केले असता बारा हजार पेक्षा अधिक विद्यार्थी यांच्या उत्फुर्त सहभागाने सदर रॅली लक्षवेधी, व अधिक यशस्वी झाली व तेवढीच शिस्तबद्ध होती हे विशेष.
सदर रॅली च्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली , उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी ,शिक्षणाधिकारी दिग्रसकर, गटशिक्षणाधिकारी आडे, जिल्हा क्रीडा अधिकारी मारावार, मनपा क्षेत्रिय अधिकारी चौरे, सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक,व शालेय विभागाचे माणिक भोसले,संजय भालके,प्रलोभ कुलकर्णी व तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment