Saturday, August 13, 2022

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित

फ्रीडम वाल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- भारतीय  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित फ्रीडम वॉल या स्पर्धेस शाळा व महाविद्यालये यांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 

ही स्पर्धा कृषीतंत्र महाविद्यालय यांच्या संरक्षक भिंतीवर आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, हर घर तिरंगा व स्वातंत्र्य चळवळीतील घटना, नेते व देशभक्तीपर चित्रे काढण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती. अशा आशयाची एकूण 16 सुंदर आकर्षक चित्रे या भिंतीवर काढण्यात आली व भिंत ही आजादी का अमृत महोत्सवाची साक्षीदार बनली.


या स्पर्धेत प्रथम क्रमांक ललीत कला अकादमी नांदेड चित्रकला शिक्षक यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक किड्स किंग्डम यांना तर तृतीय क्रमांक नागार्जुन पब्लिक स्कूल यांना मिळाला.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   218 आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे   डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार  नांदे...