Saturday, August 13, 2022

फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्त

जिल्हाधिकारी कार्यालयात चित्र प्रदर्शनाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- फाळणी दु:खद स्मृती दिन हा 14 ऑगस्ट 2022 रोजी पाळण्यात येत आहे. या दिनावर आधारित चित्र प्रदर्शन, घडामोडींचे आयोजन रविवार 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे सकाळी 11 वा. करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे. सदर माहिती http://amritmahotsav.nic.in/partition-horror-remembrance-day.htm या वेबसाईटवर उपलब्ध आहे.  

 

दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या देशाच्या फाळणी दरम्यान हजारो लोकांना ज्या मरण यातना, मन:स्ताप आणि दु:ख भोगावे लागले त्याची कल्पना देशातील सर्व नागरिकांना व्हावी यादृष्टीने फाळणी दु:खद स्मृती दिनावर आधारित चित्र प्रदर्शन, घडामोडींचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनास सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, निमंत्रित, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, पत्रकार आणि कर्मचारी, आदींची  उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास व प्रदर्शनास  सर्व संबंधितांनी भेट देऊन पाहणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...