Monday, March 22, 2021

 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर

दहावी, बारावी परीक्षेच्या वेळेत वाढ

सुधारित अंतिम वेळापत्रक, विशेष मार्गदर्शक सूचना निर्गमीत 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दहावी व बारावी लेखी परीक्षेतील पेपरची वेळ 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे व 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने एप्रिल-मे 2021 दहावी व बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात वेळेत बदल करुन सुधारित अंतिम वेळापत्रके मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

एप्रिल-मे 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकारी संकेतस्थळावर 26 फेब्रुवारी 2021 पासून उपलध करुन देण्यात आले होते. 

लेखी, प्रात्यक्षिक व तत्सम परीक्षांना प्रविष्ठ होणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी कोविड-19 विषाणुच्या पार्श्वभुमीवर विशेष मार्गदर्शन सूचना मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेल्या असून या सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. परीक्षार्थ्यांनी या विशेष मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शिक्षण राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.  

00000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...