Friday, March 24, 2017

डिजीधन मेळाव्यातील लोकराज्यच्या
दालनास पालकमंत्री खोतकर यांची भेट
नांदेड दि. 24 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेत आज डिजीधन मेळावा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात या मेळावा आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रदर्शनात नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन दालनही उभारण्यात आले. या दालनास राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आवर्जून भेट दिली व लोकराज्य विषयी प्रशंसा केली.
पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या समवेत आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदींचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी मान्यवरांना लोकराज्यचा अंक व पुष्प देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी निशिकांत तोडकर, छायाचित्रकार विजय होकर्णे, लिपीक अलका पाटील, काशिनाथ आरेवार, युसूफ पठाण, प्रवीण बिदरकर, बाल नरसय्या अंगली यांनी प्रदर्शन दालनासाठी संयोजन केले.
या दालनात लोकराज्यचे विविध अंक, विशेषांक प्रदर्शीत करण्यात आले. तसेच लोकराज्य वार्षिक वर्गणीची नोंदणी व अंकविक्रीही करण्यात आली. लोकराज्यविषयीच्या दृक-श्राव्य जिंगल्सचेही प्रसारणही करण्यात आले. यामुळे दालन आकर्षणाचे केंद्र ठरले. त्यामुळे लोकराज्यच्या या दालनास दिवसभरात अनेकांनी भेट देऊन लोकराज्यविषयी माहिती घेतली.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...