Wednesday, August 5, 2020

वृत्त क्र.  729  

 खरीप हंगामात पिकावर फवारणी करतांना खबरदारी घ्यावी

-         जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे

 

नांदेड (जिमाका), दि. 5 : खरीप हंगामात पिकावर फवारणी  करताना  केल्यानंतर शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्यादृष्टिने खबरदारी घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हा  अधिक्षक  कृषि  अधिकारी रविशंकर  चलवदे यांनी केले. पद्मश्री  विठ्ठलराव विखे  पाटील  यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.   

 

यावेळी नांदेड कापुस  संशोधन केंद्राचे वरिष्ठ  संशोधन  सहाय्यक डॉ. शिवाजी तेलंग,  जिल्ह्यातील उपविभागीय कृषि अधिकारी आर.टी. सुखदेव, बालाजी कदम, एम.के. सोनटक्के यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.  प्रारंभी  पद्मश्री  विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.  

 

डॉ.  शिवाजी तेलंग यांनी सोयाबीन पिकावरील चक्री भुंगा, खोड किड कपाशीवरील मावा, तुडतुडे, पांढरी माशी शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप्स, ट्रायकोकार्ड वापर करुन पिकावरील प्रादुर्भावानुसार किटकनाशकाच्या फवारणीबाबमार्गदर्शन केले. रासायनिक किटकनाशकांची फवारणी करण्यापुर्वी जैविक किटकनाशके फरोमन ट्रॅप्सचा वापर करुन फवारणी करतांना घ्यावयाच्या आवश्यक काळजीबाबत मार्गदर्शन केले.

 

पविभागीय कृषि अधिकारी आर.टी. सुखदेव  यांनी  प्रास्ताविकात शेतकऱ्यांना मार्गदर्शन  केले. तसेच जैन  इरिगेशनचे संजय मुटकुळे यांनी ठिबक तुषार संचाची दुरुस्ती व देखभालीबाबत शेतकऱ्यांना  मार्गदर्शन केले. यावेळी श्री. चलवदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा  सत्कार  करुन त्यांना  फेरोमन ट्रॅप व  मास्कचे वाटपही करण्यात आले. शेवटी  तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सी. डी. कदम   यांनी  सुत्रसंचालन  करुन  आभार मानले.

00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...