Saturday, October 14, 2023

 न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा

18 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौरा  

 

·    मराठा-कुणबी बाबत नोंदी, पुरावे समितीला सादर करण्यासाठी विशेष व्यवस्था   

                                                                                          

नांदेड, (जिमाका) दि. 14 :- मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी शासन निर्णय दिनांक 7 सप्टेंबर 2023 अन्वये मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य हे समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेऊन भेट देणार आहेत. सदर समिती ही नांदेड जिल्‍हयात बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड जिल्‍हा दौऱ्यावर येत आहे. बुधवार 18 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालयपरीसर नांदेड  येथे समितीची बैठक होईल.

 

नागरिकांना  कुणबी-मराठामराठा-कुणबी नोंदी अनुषंगाने पुरावे स्‍वीकारण्‍यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन येथील कॅबिनेट हॉल येथे व्यवस्था करण्यात आली आहे.  या कक्षात कार्यालयीन वेळेत नागरिकांना त्यांच्याकडील कुणबीकुणबी-मराठामराठा-कुणबी जात प्रमाणपत्राशी संबंधित उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्‍यादी पुरावे सादर करता येतील.

 

याचबरोबर ज्या व्यक्तींना मा. न्‍या. संदीप शिंदे (निवृत्‍त) व समिती यांच्‍या दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड जिल्‍हा दौऱ्यात प्रत्यक्ष निवेदन, पुरावे, सूचना द्यावयाच्या असल्यास नागरिकांना दुपारी 2 ते 4 यावेळेत सादर करता येतील. नियोजन भवन, कॅबिनेट हॉल, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे ही व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी वर नमूद केलेले राष्ट्रीय दस्ताऐवज, सनदी व नमूद पुरावे सादर करावेतअसे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...