Saturday, October 14, 2023

 महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा

नांदेड (जिमाका) दि. 14 :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार 15 ऑक्टोबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर, विमानतळ येथून श्री गुरू गोविंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.40 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव. सकाळी 11.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आगमन व पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद आयोजित शेतकरी सन्मान सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : प्रेक्षागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड . दुपारी 1.15 वा. राखीव. दुपारी 1.30 वा. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या आढावा व समन्वय बैठकीस उपस्थिती. (अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा. नुकसानीच्या अनुषंगाने ई पिक पाहणी, पिकविमा आढावा. गौण खनिज आढावा. वहिवाट रस्ते, पाणंद रस्ते. लम्पी आढावा) स्थळ: नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड. दुपारी 3 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वा. शासकीय विश्रामगृह , नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.40 वा. मोटारीने श्री गुरु गोविंद सिंह जी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.50 वा. श्री. गुरु गोविंद सिहजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. सायंकाळी 4 वा. विमानाने अकोला कडे प्रयाण करतील.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...