Friday, October 13, 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक आपत्‍ती धोके न्‍युनिकरण दिन विविध उपक्रमाद्वारे संपन्‍न

 जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक आपत्‍ती धोके

न्‍युनिकरण दिन विविध उपक्रमाद्वारे संपन्‍न

              

नांदेड, (जिमाका) दि. 13 :-  संयुक्त राष्‍ट्र संघाने आपत्‍ती धोके कमी करण्‍यासाठी लोकांमध्‍ये जागृती करण्‍याच्‍या दृष्‍टीने 13 ऑक्‍टोंबर हा जागतिक आपत्‍ती न्युनिकरण दिन घोषित केला आहे. दिनांक  8 सप्‍टेंबर 2017 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये राज्यातही  दरवर्षी सर्व जिल्ह्यामध्ये 13 ऑक्‍टोंबर हा दिवस आपत्‍ती धोके निवारण दिवस म्‍हणून साजरा करण्यात येतो. राष्‍ट्रीय आपत्‍ती प्राधिकरण नवी दिल्ली एनडीएमए यांनी आपत्‍ती प्रतिसादासाठी कटिबध्‍द होण्‍यासंदर्भात प्रतिज्ञा दिलेली आहे. या प्रतिज्ञेचे जिल्हाधिकारी  कार्यालयात सकाळी 11 वा. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सामुहिक ग्रहण केले.

 

जिल्हा आपत्‍ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आयोजीत आग या आपत्‍ती सदंर्भात महानगरपालिका नांदेडच्‍या अग्नीशमन दलामार्फत रंगीत तालीम व प्रात्‍याक्षीके सादर करण्‍यात आली. यावेळी आगीपासून बचाव करण्‍याबाबत माहिती देण्‍यात आली. तसेच हाय बिल्‍डींग रेस्‍क्युचे प्रात्‍यक्षिक दाखविण्यात आले. उपस्थित अधिकारी, कर्मचारीनागरिक पत्रकार यांच्‍या हस्‍ते प्रत्‍यक्ष अग्नीरोधक उपकरण Fire Extinguisher कशा प्रकारे हाताळावेत याबाबत प्रात्‍याक्षीकही देण्‍यात आले.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्‍या संकल्‍पनेतून अपर जिल्हाधिकारी एस.बोरगांवकरनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  किशोर कुऱ्हे यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती संतोषी देवकुळेउपजिल्हाधिकारी सामान्‍य संदीप कुलकर्णीतहसिलदार विजय अवधानेरामदास कोलगणेशंकर लाड,  अग्नीशमन अधिकारी केरोजी दासरे व अग्नीशमनदलाचे कर्मचारीजिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे बारकुजी मोरेकोमल नागरगोजे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीकर्मचारीनागरिक व पत्रकार आदींची उपस्थिती होती.

00000

 

 

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...