Saturday, October 7, 2017

जागतिक आपत्‍ती निवारण दिवस
13 ऑक्टोबरला साजरा करावा
नांदेड दि. 7 :- संयुक्‍त राष्ट्रांनी घोषित केल्‍यानुसार महाराष्ट्र शासनाने 13 ऑक्‍टोबर हा दिवस "जागतिक आपत्‍ती धोके निवारण" दिवस म्हणुन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. जगभर हा दिवस आपत्‍ती धोके निवारणासंबंधी जनजागृती करुन व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवुन साजरा करण्‍यात येतो.
जिल्‍हयातील सर्व शाळा, कॉलेजमध्‍ये या आठवडयात निबंध स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धा, पथनाटय इत्‍यादी कार्यक्रम आयोजित करावयाचे निर्देश आहेत. दि. 8 सप्टेंबर 2017 रोजीच्या शासन परिपत्रकातील निर्देशाप्रमाणे जिल्‍हयातील सर्व शैक्षणिक संस्‍था, शाळा महाविद्यालये, महानगरपालिका व जिल्‍हा परिषद शिक्षण विभाग यांनी  9 ते 13 आक्‍टोबर 2017 या कालावधीत निबंध स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धा, पथनाटय, इत्‍यादी कार्यक्रम आयोजित करावीत. तसेच प्रादेशिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रभाग, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, पोलीस जलदकृती दल, अग्निशमन व आणिबाणी सेवा यांची संयुक्‍त रंगीत तालिम या कालावधी दरम्‍यान जनतेसाठी जनजागृती करण्यासाठी  आयोजित करावीत. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन संबंधी जनजागृती साहित्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन शाखा जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...