Thursday, February 15, 2024

 वृत्त क्र. 133

जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्हा रुग्णालयात १३ फेब्रुवारी  रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन राबविण्यात आला. या मोहिमेचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.के.साखरे, डॉ. पुष्पा गायकवाड हे उपस्थित होते. या मोहिमेच्या माध्यमातुन जंताच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात याविषयी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर १ वर्ष ते १९ वर्ष वयोगटातील बालकांना अल्बेंडाझोल (जंतनाशक) गोळी खाऊ घालण्यात आली. या दिवशी गैरहजर असलेल्या बालकांना  २० फेब्रुवारी २०२४ रोजी मॉप अप दिनी अल्बेंडाझोल (जंतनाशक) गोळ्या देण्यात येणार आहेत. तरी सर्व बालकांनी  अल्बेंडाझोल (जंतनाशक) गोळी खावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...