Thursday, February 15, 2024

 वृत्त क्र. 134

सैनिक कल्याण विभागातील सरळ सेवेच्या

पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 15 :-जिल्हा सैनिक कल्याण विभाग व अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेतील गट-क पदे भरण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी वेब बेस्ड www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट टँबवर 3 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. त्यानंतर वेबलिंक बंद होईल यांची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

सैनिक कल्याण विभाग व अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सरळसेवेची पदे पुढीलप्रमाणे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक-40, वसतिगृह अधीक्षक 17, कवायत प्रशिक्षक 1, शारिरीक प्रशिक्षण निदेशक 1, गट क या पदासाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षीका गट क 3 या पदासाठी भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पुर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवाराकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील पदापैकी 1 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारी चा विचार करुन गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. ही भरती प्रक्रिया  टिसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन स्विकारण्यात येणार आहेत इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत यांची नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...