थेट कर्ज योजनेतील लाभार्थी निवड
5 जानेवारी रोजी लॉटरी पध्दतीने होणार
नांदेड (जिमाका) दि. 29 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड यांच्यामार्फत प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये केवळ थेट कर्ज योजनेअंतर्गत 10 जुलै ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आले आहेत.
या कर्ज प्रकरणांची ईश्वरी चिठ्ठी (लॉटरी) द्वारे निवड करण्यासाठी अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तथा ईश्वर चिठ्ठी समिती यांनी दिलेल्या मान्यतेनुसार चिठ्ठीद्वारे लॉटरी पध्दतीने निवड करावयाची आहे. त्यासाठी 5 जानेवारी 2024 रोजी ठिक सकाळी 12 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृह, ग्यानमाता शाळेसमोर, नांदेड येथे अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी अर्जदारांनी या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे. पात्र अर्जदारांची यादी महामंडळाच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
या योजनेअंतर्गत एकूण 71 अर्ज मागणी अर्ज प्राप्त झाले आहेत. हे सर्व कर्ज प्रस्ताव जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती समोर सादर केले असता त्यापैकी 71 अर्ज मागणी अर्ज पात्र आहेत. मागील वर्षातील उदिष्टा अभावी असलेले 311 कर्ज प्रस्ताव असे एकूण 382 पात्र प्रस्ताव आहेत.
00000
No comments:
Post a Comment