Tuesday, July 21, 2020


वृत्त क्र. 669   
शासकिय तंत्रनिकेतनमध्ये वेबिनार मालिका संपन्न
नवीन तंत्रज्ञान व सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करावा
-         सहसंचालक महेश शिवणकर
नांदेड, (जिमाका) दि. 21 :- बदलत्या परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोर जातांना नवीन तंत्रज्ञान आणि सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थी व शिक्षकांनी आत्मसात करावा, असे प्रतिपादन विभागीय सहसंचालक महेश शिवणकर यांनी केले.
कोविडच्या पार्श्वभुमीवर शासकिय तंत्रनिकेतन येथील यंत्रअभि‍यांत्रिकी विभागाकडून शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी करंट आणि इमर्जिग टेक्नॉलॉजी फंटियर्स या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय वेबिनार मालिकेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी श्री. शिवणकर बोलत होते.
या कार्यक्रमात नागपूरच्या व्ही.एन.आय.टी. राष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थेतील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अभय कुथे, पुणे येथील ऑटोमोटीव्ह क्षेत्रातील व उद्योग क्षेत्रातील तज्ञ कन्सल्टंट किरण वैरागकर, सिग्मा इलेक्ट्रिक पुणे या मल्टीनॅशनल कंपनीतील आरोग्य व पर्यावरण विभागाचे प्रमुख राजेश जलतारे आणि तंत्रनिकेतनचे प्रार्चाय डॉ. गोरक्ष गर्जे यांची उपस्थिती होती.
या शिक्षण, उद्योग जगतातील नामवंतानी वेबिनारर्सच्या माध्यमातून तंत्रनिकेतन आणि अभि‍यांत्रिकी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर आधुनिक तंत्रज्ञानातील विविध पैलूसह येत्या काळातील आव्हाने आणि संधी तसेच त्यासाठी सज्जता कशी असावी याबाबत व्याखाने व सादरीकरणाद्वारे माहिती दिली. 
या उपक्रमात महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य गर्जे, समन्वयक व सुत्रसंचालक म्हणून यंत्र अभि‍यांत्रिकी विभागप्रमुख राजीव सकळकळे व सहसमन्वयक आणि इव्हेंट ॲडमिन म्हणून जेष्ठ अभिव्याख्याता डॉ. संतोष चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंत्र विभागातील अधिव्याख्याते विजय उश्केवार, साईनाथ अन्नमवाड, अनिकेत देशट्टीवार, अनिल कदम आणि प्रशांत चव्हाण यांनी योगदान दिले.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...