Tuesday, July 21, 2020


वृत्त क्र. 670    
प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी
शाळांची पोर्टलवर नोंदणी करावी 
-         शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर
नांदेड, (जिमाका) दि. 21 :- धार्मिक अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. प्रधानमंत्री यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार सन 2020-21 साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात येत आहे. त्यासाठी ही योजना राबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांची नोंदणी एन.एस.पी. 2.0 या पोर्टलवर करणे आवश्यक आहे.
सन 2020-21 साठी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एनएसपी २.० (www.scholarships.gov.in) हे पोर्टल केंद्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जेणे करून या पोर्टलवर शाळांना अल्पसंख्याक गरजू विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करता येणार आहे. यासाठी शाळेचे नोंदणी अर्ज मुख्याध्यापक यांनी पोर्टलवर भरणे आवश्यक आहे.
मागील वर्षी ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतःच्या शाळेची नोंदणी केलेली नाही अशा शाळेची नोंदणी प्रक्रिया विहित मुदतीत तात्काळ करून घेण्यात यावी. जर एखाद्या शाळेची नोंदणी प्रक्रिया विहित मुदतीत मुख्याध्यापकांनी केली नाही तर त्या शाळेला अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी NSP २.० पोर्टल वर अर्ज भरता येतील परंतु त्या अर्जाची पडताळणी शाळांना करता येणार नाही. त्यामुळे हे अर्ज जिल्हास्तरावर पुढील प्रक्रियेसाठी जाणार नाहीत. अशा शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. ज्या शाळांनी गतवर्षी नोंदणी प्रक्रिया केली नाही अशा शाळांच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास शेख रुस्तुम शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड मो.न. (9689357212) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्य./प्राथ.) यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...