Monday, June 15, 2020

वृत्त क्र. 550


वृत्त क्र. 550   
प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेत
शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
-         जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे
नांदेड (जिमाका), दि. 15 :-  प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना हवामानावर आधारित फळपिक विमा मृग बहार आंबिया बहार योजनेत नमूद अंतिम दिनांकापूर्वी जास्तीतजास्त संख्येने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. 
नांदेड जिल्ह्यात सन 2020-21  या  वर्षासाठी प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना अंबिया बहार मृग बहारकरीता शासन निर्णय 5 जून 2020 अन्वये लागु करण्यात आली आहे.
ही योजना कार्यन्वयीत करणारी यंत्रणा / कंपनी ही बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कं.लि. बजाज अलायन्झ हाऊस, एअरपोर्ट रोड, येरवाडा पुणे-411006 आहे.
मृग बहार विमा हप्ता दर
फळपिक मोसंबी-  विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 80 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 4 हजार रुपये. लिंबु विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 70 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 3 हजार रुपये.
आबिंया बहार विमा हप्ता दर
फळपिक केळी- विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 1 लाख 40 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 7 हजार रुपये. फळपिक आंबा- विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 1 लाख 40 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 7 हजार रुपये. फळपिक मोसंबी- विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 80 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 4 हजार रुपये. फळपिक द्राक्ष- विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 3 लाख 20 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 16 हजार रुपये.
योजना अंमलबजावणी वेळापत्रक अधिसुचित मंडळांसाठी ही योजना नांदेड जिल्ह्यात पुढे दर्शविल्याप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल.  
मृग बहार विमा हप्ता दर
अधिसुचित फळपिक मोसंबी पिकासाठी विमा भरण्याची अतिंम मुदत 30 जून 2020 असून  कंधार तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळ बारुळ. धर्माबाद- करखेली, नांदेड- लिंबगाव, विष्णुपुरी. मुखेड- मुखेड, जाहुर. मुदखेड- मुदखेड, बारड. हदगाव- हदगाव, पिंपरखेड. अधिसुचित फळपिक लिंबु पिकासाठी विमाभरण्याची अंतिम मुदत 30 जून 2020 असून  उमरी तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळ उमरी आहे.  
आबिंया बहार विमा हप्ता दर
अधिसुचित फळपिक केळी पिकासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2020 असून  नांदेड तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळे  तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. अर्धापुर- अर्धापुर, दाभड. मुदखेड- मुदखेड, मुगट, बारड. लोहा- शेवडी बा. हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी. भोकर- भोकर. देगलुर- मरखेल, हाणेगाव. किनवट- किनवट, इस्लापुर, शिवणी, बोधडी. उमरी- उमरी. नायगाव- बरबडा.
अधिसुचित फळपिक आंबा पिकासाठी विमा भरण्याची अतिंम मुदत 30 सप्टेंबर 2020 असून  अर्धापूर तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळे दाभड, पाळेगाव. कंधार- कंधार. मुखेड- मुक्रामाबाद.
अधिसुचित फळपिक मोसंबी पिकासाठी विमा भरण्याची अतिंम मुदत 31 ऑक्टोंबर 2020 असून  अर्धापूर तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळे मालेगाव. नांदेड- लिंबगाव, विष्णुपुरी. मुदखेड- बारड.
अधिसुचित फळपिक द्राक्ष पिकासाठी विमा भरण्याची अतिंम मुदत 15 ऑक्टोंबर 2020 असून  अर्धापूर तालुक्यात अधिसुचित महसुल मंडळे अर्धापूर, दाभड, मालेगाव. लोहा- शेवडी बा., देगलूर- मरखेल, हानेगाव. नांदेड- तरोडा बु, तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. भोकर- भोकर. मुदखेड- मुदखेड, मुगट, बारड. हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी याप्रमाणे अधिसूचित महसूल मंडळे आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...