Friday, March 11, 2022

 महिलांचे आरोग्य हेच कुटुंबांची संपत्ती

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  महिलांचे आरोग्य हेच कुटूंबाची संपत्ती आहे. महिलांना वेळोवेळी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असून महिलांनी यासाठी दक्ष असले पाहिजेअसे प्रतिपादन जिल्हाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना केले.

 

रेल्वे स्थानक व सार्वजनिक ठिकाणी सफाई काम करणाऱ्या महिलांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केली.  हा कार्यक्रम रेल्वे स्टेशन येथील व्हि.आय.पी. हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी केले. रेल्वे स्थानकावरील कामगार महिला तसेच रेल्वे स्थानकावरील बालके यांच्या सुरक्षितातेची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे महिला बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे यांनी यावेळी सांगितले.

 

या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयरोटरी क्लबचे पदाधिकारी, वर्ल्ड व्हिजन इंडिया, चाईल्ड लाईन, तथा रेल्वे कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सारिका झुंजारे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. वर्ल्ड व्हिजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी श्यामबाबू पट्टापू यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांना व मुलांच्या प्रगतीसाठी वर्ल्ड व्हिजन प्रत्येक क्षेत्रात हातभार लावत आहे असे सांगितले. रोटरी क्लबच्या डॉ. शुभांगी पाटील यांनी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच रोटरी क्लबच्या डॉ. श्वेता अवधिया व डॉ. सुचिता भुरे यांनी महिला सुरक्षा व आरोग्य सुविधेवर मार्गदर्शन केले. नांदेड चाईल्ड लाईनचे पि.डी. जोशी पाटोदेकर यांचेही मार्गदर्शन झाले. वर्ल्ड व्हिजनने प्रकाशित केलेल्या बाल संरक्षण पुस्तकांचे लोकार्पण जिल्हा दंडाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अब्दुल रशीद शेख, लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमितकुमार गुप्ता,  पोलीस निरीक्ष सुरेशजी उनावणेरोटरी क्लब ऑफ नंदीग्राम च्या अध्यक्षा डॉ. सारिका झुंजारे अध्यक्षा, वर्ल्ड व्हिजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी श्यामबाबू पटापू , रेल्वे सुरक्षा बलाचे अनिल कुमार तिवारी, मुख्य स्वास्थ्य निरीक्षक नवल कुमार , युनिसेफच्या पुजा यादव व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व कर्मचारी, नांदेड चाईल्ड लाईन चे कर्मचारी यांची उपस्थिती होती. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

00000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...