Monday, December 13, 2021

 शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींचे सर्व शासकीय वसतिगृहे सुरू झाली आहेत. शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी संबंधीत वसतिगृहातील गृहपालाकडे प्रवेश अर्ज करण्यास 20 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. इच्छुक  पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

इच्छुक पात्र विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी इयत्ता 8 वी व 11 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या  पदवी प्रथम वर्षात  पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या तसेच जे विद्यार्थी सन 2020-21 मध्ये प्रथम वर्षात प्रवेशीत होते. ते आता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात द्वितीय वर्षात प्रवेशीत आहेत अशा विद्यार्थ्यांचे अर्ज देखील वसतिगृह प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्याचप्रमाणे थेट द्वितीय वर्षांत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील सन 2020-21 मध्ये वसतिगृह प्रवेशाचा संधी  मिळाल्याने अशा विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात प्रवेश घेतलेला आहे, त्यांना देखील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या वसतीगृह प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येईल, असेही समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...