Monday, December 13, 2021

 अनुदानावर शेतकरी उत्पादक कंपनीसाठी बिज प्रक्रिया संच 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून अटी व शर्तीच्या आधीन राहून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँक कर्जाशी निगडीत असून शेतकरी उत्पादक संघ / कंपनीने बँकेकडे प्रस्ताव सादर करावीत. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर शेतकरी उत्पादक संघ / कंपनी (एफपीओ/एफपीसी) अनुदानास पात्र राहतील. तालुका कृषि  अधिकाऱ्याकडे 15 डिसेंबर पर्यत अर्ज सादर करता येतील. लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा एकदाच लाभ दिला जाणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गंत स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (एफपीओ/एफपीसी) साठी बिज प्रक्रिया संचचा लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या अधिन राहून शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत प्रमाणित बियाणे उत्पादक करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ/कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांना बिज प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी यंत्र सामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लक्ष यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने कळविले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1146 ई - पीक पाहणी प्रक्रीया पूर्ण करा शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी आवश्यक नांदेड दि. २८ नोव्हेंबर :  शेतकऱ्यांना कोणत्याही ल...