Friday, September 1, 2017

संवाद पर्व अंतर्गत कृषि योजनांच्या माहितीचे
नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन आज प्रसारण
नांदेड, दि. 1 :- गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक जाणीव जागृती व प्रबोधन करता यावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संवाद पर्व अभियान घेण्यात येत आहे. या अभियानात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सहकार्याने विविध योजनांच्या माहितीचे प्रसारण करण्यात येत आहे.
या संवाद पर्व अभियानांतर्गत शनिवार 2 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी 7.30 वा. आकाशवाणीच्या किसान वाणी या कार्यक्रमात ठिबक सिंचन योजना व मृद आरोग्य पत्रिका या विषयांवर नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. विजयकुमार भरगंडे यांची मुलाखत प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत नांदेड आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी घेतली आहे.
या संवाद पर्व अभियानाअंतर्गत शासनाच्या विविध विकासाच्या योजना, उपक्रमांच्या माहितीचे प्रसारण होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...