Friday, October 18, 2024

 वृत्त क्र. 956

युवक-युवतींनी मतदानाचा उत्सव साजरा करावा - तहसीलदार प्रविण पांडे

नांदेड दि. 18 ऑक्टोबर :- लोकशाहीमध्ये मतदान करणे हा आपला हक्क व कर्तव्य आहे. विशेषतः युवक-युवतीनी भरभरून मतदान करणे व इतर पात्र मतदारांना मतदानास प्रेरित करणे हे त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. युवक हे राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत. एक एक मत राष्ट्र घडवण्यास आवश्यक असते. याच उद्देशाने युवक-युवतीनी येत्या विधानसभा व लोकसभेच्या पोट निवडणुकीत उत्साहाने मतदान करुन लोकशाहीचा हा उत्सव साजरा करावा, असे प्रतिपादन तहसीलदार प्रविण पांडे यांनी केले. 

आज नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातून मतदार युवकांसाठी 087 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने मतदान जनजागृतीची सुरुवात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू यांच्या प्रेरणेतून झाली. जवळपास तीनशे मतदार युवकांना मतदानाचे महत्त्व उपप्राचार्या  प्रा.कल्पना कदम यांनी विशद केले. प्रा.अनंतराव कौसडीकर  यांनी सर्वांचे स्वागत केले. 

कार्यक्रमाची सुरुवात राजेश कुलकर्णी यांनी मतदाराच्या प्रतिज्ञेतून केली. नवमतदार युवक युवतींनी आपल्या परिसरातील मतदारांच्या भेटी घेवून मतदान करण्याची गरज व आवश्यकता पटवून देवून मतदान करावेच, असे सांगावे या बाबींचा उल्लेख स्वीप सदस्य संजय भालके यांनी आपल्या आभार प्रदर्शनातून व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जी.कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.एम.वाय.कुलकर्णी,  लोक प्रशासन विभाग प्रमुख प्रा. अनंतराव कौसडीकर, बालासाहेब कच्छवे, सारिका आचमे,एस.व्हि.भालके, सुनील मुत्तेपवार, शिवराज पवार, लोक प्रशासन अभ्यास मंडळाचे डॉ. शेख हनीफ, करीयर कट्टा चे समन्वयक डॉ संतोष शेंबाळे, लोक प्रशासन विभागातील डॉ. विजय तरोडे, डॉ. सुरेश गजभारे, प्रा. शशिकांत रामगिरवार, प्रा. शिवानंद साखरे, डॉ. निलंगेकर शरणकुमार यांनी विशेष परिश्रम घेतले.

000000






No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...