Monday, October 13, 2025

 वृत्त क्रमांक  1090

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस

"वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करावा

 

नांदेडदि. 13 ऑक्टोबर :- माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार हा दिन साजरा करण्यात यावाअसे आवाहन जिल्हा‍ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

 

माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 14.10.2015 च्या परिपत्रकान्वये घेतला असून त्यानुसार दरवर्षी वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात 19 सप्टेंबर 2025 रोजी शासनपरिपत्रकान्वये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी ही विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. परिपत्रकात दिलेल्या सूचनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावाअसे निर्देश निवासी उप जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...