Monday, November 9, 2020

 

अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्रासाठी

14 ते 30 नोव्हेंबरपर्यंत विशेष पंधरवडा

नांदेड (जिमाका) दि. 9 :- पात्रताधारक अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमीत करण्याकरीता विभागीय स्तरावर 14 ते 30 नोव्हेंबर 2020 कालावधीमध्ये पंधरवडा राबविण्यात येत आहे. हा पंधरवडा यशस्वीपणे राबविण्याकरीता विभागातंर्गत कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाल कल्याण समिती, बालकांच्या काळजीसाठी कार्यरत असलेल्या संस्थाचे अधिक्षक व इतर सर्व संबंधीत यांना माहिती होण्याकरीता तसेच अनाथ प्रमाणपत्रासंबंधीचे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढून प्रमाणपत्र निर्गमीत करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडे संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडतांना त्यांच्याजवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याकारणाने, त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे महिला व बाल विकास विभागाचा 6 जून, 2016 च्या शासन निर्णयान्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमातंर्गत मान्यता प्राप्त (अनुदानित/ विनाअनुदानित) संस्थामध्ये दाखल असलेल्या व निकष पुर्ण करणाऱ्या संस्थेतील अनाथ मुलांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे.

0000  

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...