खाजगी बस, ट्रॅव्हल्स यांनी अधिक
तिकिटदर
आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्हयात
खाजगी बस, ट्रॅव्हल्स, कंत्राटी बस
परवाने धारकांकडून जर विहीत दरापेक्षा अधिक दराने तिकिटदर आकारल्यास, तसेच प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत mvdcomplaint.enf2@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी असे, आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत केले आहे.
27 एप्रिल 2018 रोजीच्या शासन
निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खाजगी बस, ट्रॅव्हल्स इ.) महत्तम भाडेदर
निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अंमलात आला आहे. तक्रारी
संदर्भाने उचित चौकशीअंती संबंधीत कंत्राटी बस परवाना धारकांच्या परवान्यावर
निलंबनाची, रद्द करण्याची
कारवाई करण्यात येईल. तसेच खाजगी
कंत्राटी वाहनांना (खाजगी बस, ट्रॅव्हल्स इ.) गर्दीच्या हंगामाच्या काळात एस.टी. बससाठी
येणाऱ्या प्रती किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर आकारता येईल. यापेक्षा
अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी mvdcomplaint.enf2@gmail.com वर
तक्रार नोंदवावी असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment