Friday, May 13, 2022

 पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका), दि. 13 :- राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पूनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे  यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

शनिवार 14 मे 2022 रोजी लातूर येथून नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आगमन व खा. शरदचंद्रजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे स्वागत. स्थळ- विमानतळ नांदेड. सकाळी 10 वा. गोदावरी अर्बन सहकारी को. ऑप. सोसायटी नवीन मुख्यालयाचा उद्घाटन समारंभास खा. शरदचंद्रजी पवार यांचे समवेत उपस्थिती. स्थळ- तरोडा नाका नांदेड. सकाळी 11.45 वा. तरोडा  नाका नांदेड येथून मोटारीने वाई ता. वसमतकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. बाभुळगाव ता. वसमत येथून नांदेडकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 3.30 ते 4.30 वाजेपर्यंत शरदचंद्रजी पवार यांचेसमवेत राष्ट्रवादी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. दुपारी 4.30 वा. शरदचंद्रजी पवार यांच्या पत्रकार परिषदेस उपस्थिती. स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. सायं 5.30 वा. कै. शामराव कदम हॉस्पिटल भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ- सामाजिक न्याय भवन जवळ नांदेड. सायं 6.30 वा. कमलकिशोर कदम यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- माधसवाड इस्टेट नमस्कार चौक म्हाळजा बायपास नांदेड. रात्री 8.30 वा. एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथे राखीव. यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. 

रविवार 15 मे 2022 रोजी शरदचंद्रजी पवार यांचेसमवेत हरिहर भोसीकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नांदेड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- शिवकृपा शाहूनगर आनंदनगर रोड नांदेड. सकाळी 10.15 वा. खा. शरद पवार पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाणावेळी उपस्थिती. स्थळ नांदेड विमानतळ. यानंतर ॲड. मोहम्मद खान पठाण यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- लेबर कॉलनी उमर फारुक मस्जिद जवळ नांदेड. सुरेश गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ- लेबर कॉलनी, उमर फारुक मस्जिद जवळ नांदेड. डॉ. उत्तम सोनकांबळे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ- जगदीश कॉलनी चैतन्यनगर तरोडा बु. नांदेड. केशव घोणसे पाटील संपादक दै. गोदातीर समाचार यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- शिवाजीनगर नांदेड. सोईनुसार नांदेड येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...