Friday, May 13, 2022

 विभागातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा

अभ्यास करण्यासाठी समितीचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- मराठवाडा विभागातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाय योजना शोधण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्यातील यंत्रमाग बहुल भागातून आठ सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली असल्याचे समिती सचिव तथा प्रादेशिक उप आयुक्त वस्त्रोद्योग, मुंबई यांनी कळविलेले आहे. सदर समिती मराठवाडा विभागातील उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यातील यंत्रमाग बहुल भागाचा दौरा करुन यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्याबाबत अहवाल शासन सादर करणार आहेत. त्यानुसार उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यातील खाजगी, तसेच सहकारी संस्थांची पदाधिकारी, सभासद यांनी आपल्या सदस्यांचे निवेदन, सूचना असल्यास उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 19 मे, 2022, नांदेड जिल्ह्यासाठी 20 व 21 मे 2022, तर बीड जिल्ह्यासाठी 20 मे, 2022 रोजी संबंधित जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहून निवेदन द्यावे.

*****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...