Tuesday, February 14, 2023

 वृत्त क्र.  67 

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक

निवडणुकीसाठी विविध कामांसाठी निविदा

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या mahatenders.gov.in या संकेतस्थळावर 14 ते 28 फेब्रुवारी पर्यंत सात ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. यात मतदान केंद्रासाठी आवश्‍यक साहित्‍य तसेच कार्यालयीन कामासाठी लेखन सामुग्री व तत्‍सम साहित्‍य पुरवठा व पुढील बाबीचा समावेश आहे. फर्निचर / मंडप भाडे तत्‍वावर पुरवठा करणे, व्हिडीओग्राफी करणेकरीता HD4K डिजिटल कॅमेरामनसह भाडे तत्‍वावर पुरवठा, भाडेतत्त्वावर सी.सी.टी.व्‍ही.(C.C.T.V.), भाडे तत्‍वावर पुरवठा संगणक, झेरॉक्‍स प्रती पुरवठा, डी.टी.पी. व छपाई करण्याबाबतच्या कामांचा यात समावेश आहे. या निविदांची विस्‍तुत माहिती mahatenders.gov.in संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसिलदार(सामान्य)यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...