वृत्त क्र. 139
जागतिक सूर्यनमस्कार दिनरथसप्तमी निमित्त
सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड दि. 3 फेब्रुवारी :- जिल्हयातील योगसंघटना, योग शिक्षक, योग मित्रमंडळ, योग विद्याधाम, योग परिषद, पतंजली योग समिती, योग ॲण्ड स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र योग शिक्षक संघ असोसिएशन आदींच्या सहकार्याने जागतिक सुर्यनमस्कार (रथसप्तमी) कार्यक्रम 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वा. यशवंत महाविद्यालय मैदान नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. नांदेड जिल्हा प्रशासन नांदेड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व क्रीडा भारती यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त यांच्या मान्यतेने नांदेड जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सुदृढतेचा मुलमंत्र नागरीक विद्यार्थी युवा यांच्यामध्ये बिंबवण्यासाठी सातत्याने शासन स्वयंसेवी संस्था तसेच या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबवित आहेत.
क्रीडा भारती महाराष्ट्र प्रदेश यांनी 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवा दिन) ते 4 फेब्रुवारी जागतिक सूर्यनमस्कार (रथसप्तमी) या कालावधीत सुर्यनमस्कार- योगप्रशिक्षण वर्ग, सुर्यनमस्कार स्पर्धा, योगासन स्पर्धा आणि विविध स्तरीय स्पर्धाचे आयोजन शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे इत्यादीना सदर दिनाच्यानिमीत्ताने कार्यक्रम क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
तसेच शहरातील महात्मा फुले हायस्कुल, बाबानगर,नांदेड, सावित्रीबाई फुले विद्यालय,बाबानगर, नांदेड, महात्मा फुले विद्यालय, विजयनगर, नांदेड, राजर्षी शाहू विद्यालय, वसंतनगर, नांदेड, नरहर कुरुंदकर हायस्कूल, कौठा, नांदेड, माधवराव वटेमोड विद्यालय नांदेड, शाकुंतल हायस्कुल नांदेड, पिनॅकल इं. मेडीयम स्कुल नांदेड व नांदेड जिल्हयातील सर्व शाळा/ क. महाविद्यालयात क्रीडा भारती यांच्या सहकार्याने 4 फेब्रुवारी रोजी वेळ सकाळी 7.30 वा. जागतिक सूर्यनमस्कार दिन रथसप्तमी निमित्त आपआपल्या ठिकाणी क्रीडा भारती यांच्या सहकार्याने मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी योग संघटना, योग शिक्षक, योग मित्र मंडळ, योग विद्याधाम, योग परिषद, पतंजली योग समिती, योग ॲण्ड स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र योग शिक्षक संघ असोसिएशन आदींच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात आयोजन करुन कार्यक्रमांचा फोटोसह अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व क्रीडा भारतीचे ई-मेल आयडी dsonanded@rediffmail.com, udaylakahalekar@rediffmail.com यावर पाठविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment