Monday, February 3, 2025

 वृत्त क्र. 141 

दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

 

नांदेड दि. 3 फेब्रुवारी :- समाज कल्याण विभाग व नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पोलीस मैदानावर आज दि.३ फेब्रुवारीला दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले.

 

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे हे होते.

 

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावारसमाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवारसमाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरेजिल्हा समाज  कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती.

0000















No comments:

Post a Comment

  चला घडवूया विकसित महाराष्ट्र ! विकसित महाराष्ट्राची रुपरेषा ठरविण्यात आपला सहभाग द्या! 'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन ...