Monday, February 3, 2025

 वृत्त क्र. 140

सन्मान योजनेंतर्गत साहित्यिक, कलाकारांच्या 11 वारसांसाठी अनुदान मंजूर

* जिल्हा प्रशासनाने मानले लाभार्थ्यांनी आभार 

नांदेड दि. 3 फेब्रुवारी :- राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत जिल्हयातील 11 मयत लाभार्थ्यांच्या वारसास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकतेच अनुदान मंजुर केले आहे. ही योजना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांचा शासन निर्णय 16 मार्च 2024 अन्वये राबविण्यात येत आहे. ही योजना गरजू व होतकरु तळागाळातील साहित्यिक, कलावंत यांच्यापर्यंत प्रशासनाने पोहचविल्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेअंतर्गत जिल्हा निवड समितीची पूनर्रचना करण्यात आली आहे. या योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सदस्य सचिव उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) श्रीमती मंजुषा जाधव (कापसे) या सर्वांचे जिल्ह्यातील राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांकडुन व त्यांच्या विविध संघटनेकडुन आभार व्यक्त करण्यात आले आहे.

000

No comments:

Post a Comment

  वृत्त   क्र. 1 41   दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न   नांदेड दि. 3 फेब्रुवारी :- समाज कल्याण विभाग व ना...