Friday, October 10, 2025

वृत्त क्रमांक  1082

आठवा राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम तरोडा खुर्द येथे साजरा

नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर कार्यालयाअंतर्गत तरोडा (खु.) बिट मधील शास्त्रीनगर येथील अंगणवाडी केंद्रावर 9 ऑक्टोबर रोजी 8 वा राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी अंगणवाडीतील सर्व सेवांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या कामकाजाचे प्रशंसा त्यांनी केली.  

नागरी नांदेड शहरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी के. व्ही. तिडके यांनी  सन 2025 पोषण माह थीम जेवणामध्ये साखर व तेलाचे प्रमाण, प्रारंभिक बाल्यवस्था काळजी व संगोपन, कुपोषण निर्मुलनाबाबत उपाययोजना इत्यादी बाबत जनजागृती केली आहे. 

या कार्यक्रमांतर्गत बिट मधील कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी ICDS च्या सर्व योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना इत्यादी बाबत श्रीमती दुर्गा सांगोळे यांनी गरोदर मातेची भुमिका साकारली व श्रीमती नंदा जोंधळे यांनी अंगणवाडी सेविकेची भुमिका साकारून नाटिकेतून जनजागृती केली.

हा कार्यक्रम बाल विकास प्रकल्प अधिकारी के. व्ही. तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. प्रस्ताविक मुख्यसेविका श्रीमती ए. बि. शिसोदे यांनी केले. अंगणवाडी सेविका श्रीमती नंदा जोंधळे यांनी सुत्रसंचलन केले. कार्यालयातील मुख्यसेविका श्रीमती जी. एस. गुंडारे, श्रीमती. एस. एम. पेंदे, श्रीमती. व्हि.आर. गरूड, श्रीमती. एस. बि. शिसोदे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बिट मधील अंगणवाडी सेविका श्रीमती नंदा जोंधळे, श्रीमती दुर्गा सांगोळे, सर्व सहकारी सेविका व मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...