Friday, October 10, 2025

वृत्त क्रमांक  1076

रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा

नांदेड दि. 10 ऑक्टोबर :- शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी रब्बी हंगाम पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटीवर बुधवार 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान-कडधान्य-गहू, हरभरा, पौष्टिक तृणधान्य-रब्बी ज्वारी, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया-करडई, सुर्यफुल व राष्ट्रीय कृषि विकास महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेंतर्गत-ज्वारी या घटकांतर्गत रब्बी हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी हरभरा 1 हजार 900 हेक्टर, गहू 280 हेक्टर, ज्वारी 2 हजार 510 हेक्टर व  करडई 1 हजार 169 हेक्टर क्षेत्रावर पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 

यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाणांचे बियाणे, खते व एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा अनुदान तत्त्वावर केला जातो. यामुळे शेतकऱ्यांच्या गटांना एकत्रितपणे शेतीतील उत्कृष्ट पद्धती आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळते. तसेच गटांची निवड 'पहिले येईल त्याला पहिले प्राधान्य' या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे पात्र शेतकरी गटांनी विहित मुदतीत तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या गट, संस्था सदस्याकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.

पीक प्रात्यक्षिकासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे दि. 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र आहेत. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer /AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर बियाणे वितरण फलेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईल अंतर्गत शेतकरी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थाना अर्ज करता येईल. 

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...