Wednesday, April 18, 2018


लोहा येथे जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांची

पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न

 

नांदेड, दि. 17:- राज्याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी, नदी गंगा पुरुत्थान केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचा दि. 19 एप्रिल 2018 रोजी लोहा तालुका दौऱ्याच्‍या अनुषंगाने पूर्वतयारी करुन आवश्‍यक नियोजन करण्‍यासाठी विविध विभागाच्‍या अधिकारी यांची आढावा बैठक जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्‍यक्षतेखाली  लोहा तहसील कार्यालयात घेण्‍यात आली. 

या बैठकीस आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिीती होती.  या बैठकीस जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्‍हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीना, कंधारचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे, लोहा तहसीलदार डॉ. आशीषकुमार बिरादार, कंधार तहसीलदार श्रीमती अरुणा संगेवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

          या बैठकीस पशु वैदयकिय अधिकारी डॉ. पुरी आर एम., सहायक निबंधक सहकार विभाग जी.आर. कौरवार, निरीक्षक आर. एन. कोतवाल,टीएचओ अॅड. प्रविण मुंडे ,तांत्रीक मुलगे अमोल विश्‍वनाथ , पवार जे.व्‍ही ,अभियंता मिटेवाड व्‍ही.एन , अभियंता एन. व्‍ही. पट्टेवाड, उपअधिक्षक पी. एम. संख्‍ये , जन.मॅनेजर आर. वाय. सिंग,जन.मॅनेजर वाय. एन. घोटकर ,कार्यकारी अभियंता विवेक बडे, उपविभागिय अभियंता चितळे आर, नायब तहसीलदार जी. पी. नागरगोजे, नायब तहसीलदार सारंग चव्‍हाण, गटशिक्षणाधिकरी बी. पी. गुट्टे , उपकोषागार  आर. जी. सरवर,                    बी. घोरबांड, उपविभागीय कार्यकारी अभियंता, महेश वाघमारे , ता. कृ. अधिकारी व्‍ही.एन. मंगनाळे ,गटविकास अधिकारी  पी. पी. फांजेवाड, लोहा मुख्‍याधिकारी ए. एम. मोकले आदि. विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

            जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे पुढे म्हणाले की, राज्याचे  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस रस्ते वाहतूक  आणि जहाज बांधणी, नदी गंगा पुरुत्थान केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्‍या लोहा येथील दौऱ्याच्या अनुषंगाने विविध विभागांना आवश्‍यक नियोजन करण्याबाबत महत्‍वपूर्ण सूचना दिल्‍या.

मा. मुख्‍यमंत्री मा. ना. केंद्रीय मंत्री यांच्या दौऱ्याच्‍या अनुषंगाने हेलीपॅडची जवळची जागा निश्‍चीत करावी.  सुरक्षितता, आवश्‍यक पोलीस बंदोबस्‍त राहील, याची दक्षता घ्‍यावी. हेलीपॅड परिसर लगतच्‍या भागात उंच इमारती तसेच उच्‍च दाबाच्‍या विद्युत वाहिन्‍या नसतील, याची काळजी घ्‍यावी. तसेच वैद्यकीय सुविधा, स्‍वच्‍छता विभाग, विद्युत पुरवठा, शासकीय विश्रामगृह, अग्निशामक व्‍यवस्‍था, रस्‍ता दुरुस्‍ती, बॅरिकेटींग ,दूरसंचार विभाग, अन्‍न औषध प्रशासन, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, पासेस व्‍यवस्‍था, कायदा सुव्‍यवस्‍था, मा. मुख्‍यमंत्री मा. ना. केंद्रीय मंत्री यांच्या दौऱ्याच्‍या अनुषंगाने पोलीस विभागाने चोख बंदोबस्‍त ठेवावा. कायदा सुव्‍यवस्‍था अबाधित राहिल याची काळजी घ्‍यावी,  अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या. 

    सर्व विभाग यांनी आपआपली जबाबदारी पार पाडावी आणि मा. मंत्री महोदयांच्या दौरा कार्यक्रमात कुठलीही अडचण भासणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी अशी सूचना जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सर्व विभागास दिली.  तसेच लोहा तहसीलदार डॉ. आशीषकुमार बिरादार, यांनी बैठकीचे प्रास्‍ताविक केले.  

 

****





No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...