Wednesday, April 18, 2018


ग्राहक मार्गदर्शक मेगा कॅम्प  

नांदेड, दि.17:-  जिल्हा ग्राहक संरक्षणतंर्गत भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था, मुंबई यांच्यामार्फत ग्राहकांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन दिनांक 18 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 11-00 वाजता तहसील कार्यालय, नांदेड येथे करण्यात आले आहे.

        या शिबीरास ग्राहकांना दुध, अन्नपदार्थ यामध्ये असलेली भेसळ, वजनमापातील फरक, ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रारींचे निराकरण, हुशार गुंतवणुकदार कसे बनावे, दुरसंचार सेवा, बांधकाम , व्यावयसायिकांविरुध्दच्या तक्रारी इत्यादीबाबात मागर्दर्शन केले जाणार आहे.

            या कार्यक्रमास श्रीमती अनंदिता कौर, श्रीमती प्राची मयेकर, श्रीमती मिलन मेस्त्री, टी.के. पवार भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत.

            सर्व जनता ग्राहकांनी दिनांक 18 एप्रिल, 2018 रोजी साजरा होणाऱ्या मार्गदर्शन शिबीराच्या कार्यक्रमास तहसील कार्यालय, नांदेड येथील बैठक हॉल येथे सकाळी 11-00 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

****

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...