Wednesday, April 18, 2018


मागेल त्‍याला शेततळे योजनेबाबत तहसिल कार्यालय, नांदेड येथे

कार्यशाळा / बैठक संपन्न

             नांदेड, दि.17:- नांदेड तालूक्‍यात 134 लाभार्थ्‍यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला असून, त्‍यातील 21 लाभार्थ्‍यांच्‍या शेतात शेततळे झाली आहेत. उर्वरीत 113 लाभार्थ्‍यांना सदर योजनेबाबत माहिती व्‍हावी त्‍यांनीही शेततळे लवकरात लवकर घ्‍यावेत, यासाठी सदर बैठक/कार्यशाळा घेण्‍यात आली.

सदर बैठक तहसिल कार्यालय, नांदेड येथे येथील तहसिलदार किरण अंबेकर यांच्या अध्‍यक्षतेखाली "मागील त्याला शेततळे" या योजनेबाबत बैठक/कार्यशाळा घेण्‍यात आली. ज्‍यामध्‍ये महसूल, कृषि, शेतकऱ्याची एकत्रित बैठक झाली.

या बैठकीत सुरुवातीस नांदेड तालुका कृषी अधिकारी श्री. गिते यांनी प्रास्‍ताविक केले, त्‍यानंतर ज्‍या शेतकऱ्यांनी  यापूर्वी शेततळे घेतली त्‍यांची मनोगत घेण्‍यात आले. ज्‍यामध्‍ये भगवानराव पाटील अलेगावकर, व्‍यंकटराव पाटील करखेलीकर, सतिष कुलकर्णी-काकांडी, प्रशांत तिर्थे-इलिचपुर, विलास पोहरे-मरळक या शेतकऱ्यांनी शेततळे आणि शेतीचे महत्त्व सांगितले आणि तहसीलदार किरण अंबेकर यांनी विस्तृत असे मार्गदर्शन करून सर्व शेतकरी क्षेत्रिय स्‍तरावरील अधिकारी / कर्मचारी यांचे मनोबल वाढवून चालू वर्षी दिलेले उद्दिष्टे पूर्ण करण्याचे संबंधीत कृषी सहायक तलाठी यांना आदेशीत केले. या कार्यशाळा / बैठकीमध्‍ये शिल्‍लक राहिलेल्‍या 113 लाभार्थ्‍यांपैकी जास्‍तीत-जास्‍त लाभार्थी यांची शेततळे पूर्ण करण्‍यात येतील. तसेच नवीन अर्जदारांबाबत देखील संबंधीतांना सविस्‍तर मार्गदर्शन करुन त्‍यांची प्रशासकिय मंजूरी याबाबतची कार्यवाही सत्वर करण्‍यात येईल, अशी ग्‍वाही कृषी सहायक यांनी दिली. कार्यक्रमात तहसिलदार किरण अंबेकर,  तालूका कृषी अधिकारी श्री. गीते, नायब तहसिलदार विजयकुमार पाटे, रोहयो

अ.का., अ.का. डी.आर.पोकले यावेळी तालूक्‍यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक शेतकरी यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

****

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...