Wednesday, March 13, 2024

'मतदानाची टक्केवारीत वाढ आणि नवतरुणांचे मतदान ' रील तयार करा ! शॉर्ट फिल्म तयार करा ! बक्षिसे जिंका !

वृत्त क्र. 234

 'मतदानाची टक्केवारीत वाढ आणि नवतरुणांचे मतदान

रील तयार करा ! शॉर्ट फिल्म तयार करा ! बक्षिसे जिंका !

 

नांदेड दि. 13 : नांदेड जिल्ह्याची मतदान टक्केवारी महाराष्ट्रात सर्वाधिक असावी यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृती मोहीम राबवणे सुरू केले आहे. 20 मार्चपर्यंत आयोजित रील व शॉर्ट फिल्म तयार करण्याच्या स्पर्धेत तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

लोकशाहीमध्ये मताधिकार आणि सुलभ पद्धतीनेपारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडणे ही केवळ प्रशासनाचीच जबाबदारी नाही. तर प्रत्येक जागृतराष्ट्राभिमानीसुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिकांची जबाबदारी आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये ही जबाबदारी पार पाडव्यासाठी तरुणाईने आपले कौशल्य दाखवावे यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीप कक्षामार्फत (सिस्टिमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन ) या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

 

नांदेड जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असावी यासाठी जिल्हा प्रशासनाने रील व शॉर्ट फिल्म तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. तरुण-तरुणी मध्ये लोकप्रिय असणाऱ्या रिल निर्मिती आणि आपल्या मोबाईलवर शॉर्ट फिल्म तयार करणाऱ्या तरुण कलाकारांना यामध्ये नामी संधी आहे. स्वीप नांदेडअॅटजीमेल डॉट कॉम (sweepnanded@gmail.com )या मेलवर आपली ही कलाकृती पाठवायची आहे. 30 सेकंदाचे रील. आणि जास्तीत जास्त ५ मिनीटाची शॉर्ट फिल्म तयार करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने तरुणाई पुढे ठेवले आहे. नागरिकांनी मतदानाची टक्केवारी वाढवावी तसेच नवमतदारांनी मताधिकार वापरावा या विषयाला समर्पित रील व शॉर्ट फिल्मची निर्मिती असावी. 20 मार्चपर्यंत सोबत दिलेल्या ई-मेलवर (sweepnanded@gmail.com आपले रील व शॉर्ट फिल्म आपल्याला पाठवायची आहे. १८ वर्षे अधिक वय असणाऱ्या तरुण-तरुणीला या स्पर्धेत भाग घेता येणार आहे.

 

यापैकी उत्कृष्ट ठरणाऱ्या रिल्स व शॉर्ट फिल्मचा वापर जिल्हा प्रशासनाच्या प्रसिद्धी मोहिमेतही करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन प्रत्येक तालुका निहाय बक्षीस देणार आहे. तसेच जिल्हास्तरावरही उत्कृष्ट रील व शॉर्ट फिल्मला गौरवण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची जिल्हा प्रशासन विशेष नोंद घेणार असून वरील दिलेल्या विषयाशिवाय अन्य विषय त्यामध्ये नसावाविषयाची मांडणी करताना कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही,तसेच मांडणीतून कोणत्याही धर्मजातवंश किंवा कोणावरही वैयक्तीक टीकाटिप्पणी होणार नाही अशा पद्धतीने विषयाची मांडणी करावीअसे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.



00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...